---Advertisement---

रावेर तालुक्यात अनैतिक संबंधातून तरुणाचा खून : आरोपीला तीन दिवसांची पोलिस कोठडी

---Advertisement---

भुसावळ : रावेर तालुक्यातील सायबूपाडा-निमड्या रस्त्यावरील अली नाल्याजवळ संजय रेमसिंग पावरा (30, सायबूपाडा नवाड, ता.रावेर) या तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. या प्रकरणी 24 तासात रावेर पोलिसांनी किनेश उर्फ किन्या सजन पावरा (28, सायबूपाडा नवाड, ता.रावेर) या तरुणास अटक करीत खुनाचा गुन्हा उघडकीस आणला होता. मयत संजयचे आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशयित आरोपीला संशय असल्याने त्यातून खुनाची घटना घडली होती. दरम्यान, किन्या पावरा यास सोमवारी रावेर न्यायालयात हजर केले असता 13 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

अनैतिक संबंधातून तरुणाला संपवले
सायबूपाडा गावातील संजय पावरा या तरुणाचे घराशेजारी राहणार्‍या विवाहितेशी अनैतिक संबंध असल्याचा महिलेच्या पतीला संशय होता व 7 एप्रिल रोजी सकाळी दोघांना सोबत पाहिल्यानंतर संशयित आरोपी किनेश पावरा याने सायंकाळी संजय यास गावाबाहेर नेवून त्यास दारू पाजत तो मद्यधूंद होताच त्याच्या डोक्यात व तोंडावर मोठा दगड टाकून त्याची हत्या केली होती. मयताशी अखेरचा संवाद आरोपीचा झाल्याचे सीडीआरमध्ये स्पष्ट होताच पोलिसांनी त्यास चौकशीकामी ताब्यात घेतल्यानंतर गुन्ह्याची उकल झाली. दरम्यान, सोमवारी संशयित किनेश यास रावेर न्यायालयात हजार केले असता त्यास तीन दिवसांची (13 एप्रिलपर्यंत) पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment