---Advertisement---

पाच जिवंत काडतुस, दोन गावठी कट्यांसह पाच जणांना अटक

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह । चोपडा : चारचाकी वाहनातून देशी बनावटीचे दोन कट्टे, पाच जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. यात पाच जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गुरुवारी रात्री चोपड्यानजीक सत्रासेन घाटात करण्यात आली.

किरण कमलाकर शिंदे (२४, रा.लासलगाव ता.निफाड), टिनू उर्फ दशरथ रामचंद्र पवार (३५), रामचंद्र विश्वनाथ दाभाडे (३०), युवराज भगवान माळे (२६), केशव बंडूजी वखरे (४६, सर्व रा. पिंपळगाव बसवंत) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ३ लाख ६० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पो.नि.कावेरी कमलाकर, पो.कॉ.राकेश पाटील, लक्ष्मण शिंगाणे यांनी ही कारवाई केली.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment