तरुण भारत लाईव्ह । १७ एप्रिल २०२३। गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात सतत उंच्चाक व घसरण पाहायला मिळाली. गेल्या वर्षीपेक्षा यंदा अक्षय्य तृतीया येण्याआधीच सोन्याच्या दराने उच्चांकाची पातळी गाठली आहे. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकाळच्या सत्रात सोन्याचा भाव स्थिर दिसून आला मात्र दुसरीकडे चांदीच्या किमतीत किंचित घसरण दिसून आली.
आज एक किलो चांदीचा भाव 75,८00 रुपये (विना जीएसटी) इतका आहे. तो काल ७५, ९०० रुपये इतका होता. म्हणजेच त्यात १०० रुपयाची घसरण दिसून येतेय. दोन दिवसापूर्वी शनिवारी त्यात 1600 रुपयाची घसरण झाली आहे. मात्र गेल्या आठवड्यात चांदीच्या किमतीत मोठी वाढ झालेली दिसून आली. गेल्या आठवड्यात चांदी 1300 रुपयांने महागली आहे.