---Advertisement---

तरुणी जिथे कामाला जायची, नराधमही तिथेच.. बातमी वाचाल तर तुम्हालाही येईल संताप

---Advertisement---

जळगाव : महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले असून पुन्हा एका  16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांनी अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक म्हणजे, अत्याचारातून अल्पवयीन तरुणी गर्भवती राहिली. या प्रकरणी पोलीसांत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.  बारकू उर्फ प्रवीण बाळू पाटील (23), पप्पू उर्फ शुभम बापू पाटील (23, दोघे रा.सावखेडा तुर्क, ता.पारोळा) आणि भावश्या उर्फ भाऊसाहेब वसंत पाटील (25, रा.सावखेडा होळ, ता.पारोळा) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.

पोलिसांत दिलेल्या पिडितेच्या तक्रारीनुसार, पारोळा तालुक्यातील ज्या शेत शिवारात पीडित तरुणी कामाला जात असे तिथे-तिथे संशयित आरोपी शेतात कामाला जात होते. जवळीक वाढवून संशयितांनी पीडित तरुणीवर अत्याचार केला. तसेच कुणाला काही सांगितल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.

या प्रकारानंतर पीडितेला त्रास होऊ लागल्याने ही बाब आईला सांगितल्यानंतर खाजगी रुग्णालयात तपासणी केली असता पीडीता ही 16 आठवड्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी पारोळा पोलिसांत पीडितेच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून तिघा संशयित आरोपीना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव करीत आहेत.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment