---Advertisement---
तरुण भारत लाईव्ह । ३० एप्रिल २०२३ । पंजाबच्या लुधियाना मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रहिवासी भागात असलेल्या कारखान्यातून वायूची गळती झाल्यानं ९ जणांचा मृत्यू झाला असून अनेकांची प्रकृती गंभीर आहे. घटनास्थळी एनडीआरएफचं पथक दाखल झालं आहे. बचाव कार्य सुरू आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी सातच्या सुमारास कारखान्यातून वायू गळती झाली. त्यानंतर लोकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. काहींना उटल्या सुरू झाल्या. वायूचा गंध अतिशय तीव्र असल्यानं लोकांनी तोंड आणि नाक बांधून घेतलं. श्वास घेण्याचा त्रास होत असलेल्या १० जणांची प्रकृती गंभीर आहे. काही जण जीव वाचवण्यासाठी घराबाहेर पडले आहेत.
संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. स्थानिकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. घटनास्थळी एनडीआरएफचं पथक दाखल झालं आहे. बचाव कार्य सुरू आहे. दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला असून ११ जणांची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती लुधियानाच्या उपविभागीय दंडाधिकारी स्वाती यांनी दिली.पोलीस आणि प्रशासनाची पथकं घटनास्थळी पोहोचली आहेत. लोकांना रुग्णालयात नेण्यात येत आहे.









