धुळे : दुचाकीवर दंडात्मक कारवाई न करण्यासाठी दोनशे रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना धुळ्यातील शहर वाहतूक दलातील हवालदार उमेश दिनकर सूर्यवंशी यास धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी सकाळी लाच स्वीकारताच अटक केली. धुळे शहरातील अँग्लो उर्दू हायस्कूलसमोरील रस्त्यावर हा सापळा यशस्वी करण्यात आला. चाळीसगावातील तक्रारदाराने या संदर्भात तक्रार दिली होती. कागदपत्रे व लायसन्स असतानाही या ना त्या कारणातून उमेश सूर्यवंशी हे लाच मागत असल्याने तक्रारदाराने 2 रोजी तक्रार नोंदवली व पडताळणी होवून सापळा रचताच संशयीताला बुधवारी अटक करण्यात आली.
दोनशे रुपयांची लाच : वाहतूक शाखेचा कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात
by Ganesh Wagh
Updated On: मे 3, 2023 1:14 pm

---Advertisement---