---Advertisement---

मिक्स कडधान्यांचे सँडविच रेसिपी

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह । ९ मे २०२३। तुम्ही आतापर्यंत बऱ्याच प्रकारचे सँडविच ट्राय केले असतील पण कधी मिक्स कडधान्यांचे सँडविच खाल्लं आहे का? नसेल खाल्लं तर आज घरी नक्की ट्राय करून पहा. मिक्स कडधान्यांचे सँडविच घरी बनवायला खूप सोप्प आहे. मिक्स कडधान्यांचे सँडविच घरी कसे बनवले जातात हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

साहित्य 
१ कपभर मिक्स कडधान्ये, १ कप कोथिंबीर, ३ हिरव्या मिरच्या, ब्रेड स्लाइसेस, गव्हाचे पीठ, तेल, मीठ, पर्यायी साहित्य (हवे असल्यास): १ कांदा, १ टोमॅटो( पातळ काप केलेला), ऑलिव्ह तेल.

कृती 
सर्वप्रथम एका पॅनमध्ये १ कप पाणी घेऊन ते चांगले उकळवा. त्यात सर्व कडधान्य १० मिनिटे शिजवून मग त्याती पाणी गाळून घ्या. त्यात मीठ घालून मिक्सरमधून चांगली पेस्ट होईपर्यंत फिरवा. एका पॅनमध्ये तेल गरम करा. मग ही कडधान्यांची पेस्ट त्यात घाला.थोडेसे पाणी घेऊन त्यात गव्हाचे पीठ मिसळून तयार केलेली पेस्ट कडधान्यांच्या पेस्टमध्ये मिसळा. मिश्रण चांगले ढवळा आणि दोन मिनिटांनंतर गॅस बंद करा.

कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि मीठ घालून चांगली पेस्ट करून हिरवी चटणी तयार करा. ही हिरवी चटणी ब्रेड स्लाइसेसवर पसरवा. त्यातील एका स्लाइसवर कडधान्यांची पेस्ट पसरवा. त्यावर दुसरी स्लाइस ठेवा. तवा गरम करून त्यावर थोडेस ऑलिव्ह ऑइल लावून त्यावर हे सँडविच १ मिनिटभर दोन्ही बाजूंनी शेकून घ्या. किंवा सँडविचमेकर मध्येही शेकू शकता. गरमगरम सर्व्ह करा.

 

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment