जाहिरात पहा : PDF ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी : येथे क्लीक करा
पोरांनो नोकरीचा हा चान्स सोडू नका..! मुंबईत 5182+ जागांसाठी निघाली भरती, त्वरित करा अर्ज
Published On: मे 10, 2023 5:16 pm

---Advertisement---
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय मुंबई येथे बंपर निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. या भरती संदर्भात अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर नुकतीच जारी झाली असून अधिसूचनेनुसार या भरती अंतर्गत विविध पदांच्या 5182+ जागा भरल्या जाणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक 25 मे 2023 असणार आहे.
ही पदे भरली जाणार?
प्रयोगशाळा सहाय्यक
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
ग्रंथपाल
स्वच्छता निरिक्षक
ई.सी.जी. तंत्रज्ञ
आहारतज्ञ
औषधनिर्माता
डॉक्युमेंटालिस्ट/ग्रंथसूचीकार
समाजसेवा अधिक्षक (वैद्यकीय)
ग्रंथालय सहाय्यक
व्यवसायोपचारतज्ञ / ऑक्युपेशनथेरेपीस्ट
दुरध्वनीचालक
महिला अधिक्षीका / वॉर्डन
वसतीगृह प्रमुख/ वसतीगृह अधिक्षीका
अंधारखोली सहाय्यक
क्ष-किरण सहाय्यक
सांखिकी सहाय्यक
दंत आरोग्यक/ दंतस्वास्थ आरोग्यक
भौतिकोपचारतज्ञ
दंत तंत्रज्ञ
सहाय्यक ग्रंथपाल
श्रवणमापकतंत्रज्ञ / ऑडियोव्हिजनल तंत्रज्ञ /
विद्युत जनित्र चालक / जनरेटर ऑपरेटर
नेत्रचिकित्सा सहाय्यक
डायलेसिस तंत्रज्ञ
शारिरिक शिक्षण निर्देशक / शारिरिक प्रशिक्षण निर्देशक
शिंपी
सहाय्यक दंत तंत्रज्ञ
मोल्डरूम तंत्रज्ञ
लोहार / सांधाता
वाहनचालक
गृह नि वनपाल / गृहपाल/ लिनन किपर
क्ष किरण तंत्रज्ञ
सुतार
कातारी- नि जोडारी
जोडारी मिश्री / बॅचफिटर
वरिष्ठ लिपिक
अधिपरिचारीका
उच्चश्रेणी लघुलेखक
निम्नश्रेणी लघुलेखक
लघुटंकलेखक
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पासून बारावी पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी उमेदवारांनी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. (सविस्तर पात्रतेसाठी कृपया जाहिरात पाहावी)
मिळणारे वेतन किती? : 19,900 रुपये ते 1,22,800 रुपये
अर्ज फी :
खुला वर्ग: रु. 1000/- + बँक शुल्क
मागासवर्गीय/ आर्थिकदृष्ट्या दुर्बल/ अनाथ: रु. 900/- + बँक शुल्क
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 मे 2023
वेबसाईट : www.med-edu.in
---Advertisement---