---Advertisement---

शहाद्यात तीन मजली इमारतीला भीषण आग, मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान

---Advertisement---

शहादा : शहरातील बस स्थानक परिसरात असलेल्या तीन मजली इमारतीला आज अचानक आग लागली. तिसऱ्या मजल्यावर आग लागल्याने धुराचे मोठे लोळ निघत होते. दरम्यान, शहादा अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने कुठीलीही जिवीत हानी झाली नाही.

मात्र आगीत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तिसऱ्या मजल्यावर अचानक धुराचे लोळ दिसू लागल्याने परिसरात एकच धावपळ सुरू झाली होती.  त्यानंतर आगीने भीषण स्वरूप धारण केले होते. तिसऱ्या मजल्यावर सर्वत्र आग पसरली होती.  शहादा अग्निशामक दलाच्या जवानांनी वेळेवर आगेवर नियंत्रण मिळवले. आगीचे नेमके कारण अजून समजू शकलेले नाही.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment