---Advertisement---
तरुण भारत लाईव्ह। १३ मे २०२३। कर्नाटक निवडणुकीचा निकाल दि. १३ मे रोजी लागणार आहे. त्यानुसार कर्नाटकमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसनं आघाडी घेतलेली पाहायला मिळाली आहे. त्यावरून खासदार संजय राऊत म्हणाले की, ‘या कलानुसार भाजपाचा कर्नाटकचा निकाल हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना पूर्णपणे झिडकारून लावलं आहे. हा त्यांचा पराभव आहे. ही लोक भावना आहे. ही देशाच्या मन की बात त्यातून बाहरे पडत आहे,असे संजय राऊत म्हणाले.