---Advertisement---
Crime News : राज्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. अशातच पुन्हा चाळीसगाव (जि.जळगाव) शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सात वर्षीय चिमुकलीला घरी सोडतो असे म्हणत एकांत ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घृणास्पद घटना घडली. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून एकाला अटक आली.
नेमकी घटना काय?
सूत्रानुसार, चाळीसगाव शहरात ७ वर्षीय चिमुकली आपल्या कुटूंबासह वास्तव्यास आहे. दरम्यान, संशयित आरोपी आकाश उर्फ सुपड्या विठ्ठल पाटील (वय-२९) रा. नारायणवाडी, चाळीसगाव याने ‘घरी सोडून देतो’ असे सांगून तिला स्कुटीवर बसून शहरातील टेनिस ग्राउंड येथे नेऊन तिच्यावर अत्याचार केला. चिमुकली रडू लागल्याने तिला ‘घरी सोडून देऊन “तू जर आई-वडिलांना सांगितले, तर तुला मारून टाकेल” अशी धमकी दिली.
दरम्यान आपल्यावर झालेला प्रसंग चिमुकलीने तिच्या आईजवळ कथन केला. ही धक्कादाय घटना घडल्यानंतर पीडित मुलीसह तिची आई यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी आकाश उर्फ सुपड्या विठ्ठल पाटील यांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल टकले यांनी सुपड्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल टकले करीत आहे.