---Advertisement---
नाशिक : त्र्यंबकेश्वर मंदिराच्या घटनेत हिंदू धर्मियांशिवाय इतरांना प्रवेश दिला जात नाही असे नियम आहेत. मात्र तरीही 13 मे रोजी रात्री काही व्यक्तींनी उत्तर (महाद्वार) दरवाजाने जबरदस्ती आत जाण्याचा प्रयत्न केला. या घडलेल्या प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली. यामुळे सामाजिक सलोखा बिघडू नये, सामाजिक तेढ निर्माण होऊ नये याकरिता देवस्थान ट्रस्ट प्रशासनाने त्र्यंबक पोलीस ठाण्यात घडल्या प्रकाराबाबत पत्र दिले आहे.
सदर घटनेचा तपास करून संबंधीतांवर याग्य ती कारवाई करण्याची मागणी देखील मंदिर ट्रस्ट सह ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. दरम्यान अशाच प्रकारे पुरोहित संघ, ब्राम्हण महासंघ, मराठा महासंघ यासह सुमारे 15 हिंदुधर्मिय संघटनांनी निवेदन तक्रार अर्ज दिले आहेत.
यावेळी 10 ते 12 युवकानी मंदिरात शिरण्याचा प्रयत्न केला. तेथे बंदोबस्तास असलेले एमएसएफ जवानांनी त्यांना रोखले. आपणास आत जाता येणार नाही असे सांगीतले. त्यानंतर जवळपास 15 मिनेट त्यांच्या हुज्जत झाली. मात्र अखेर प्रवेश न घेता ते तेथून पुढे निघुन गेले.
दरम्यान, आज याबाबत त्रंबकेश्वर पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे, सहायक पोलिस निरीक्षक जगताप, गवळी यांच्या उपस्थितीत शांतता समितीच्या सदस्यांची बैठक घेऊन शहराची शांतता अबाधित राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे व मंदिरात प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करणार्या लोकांना सक्त ताकीद देण्यात आली आहे.