---Advertisement---
जळगाव : चालू वर्षात खरीप आणि रब्बी साठी शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट जिल्हा बँकेने निश्चित केले आहे केळीसाठी हेक्टरी 15000 तर बागायती कापसासाठी 46 हजार रुपये कर्ज वितरीत केले जात आहे. आतापर्यंत एक लाख दहा हजार शेतकऱ्यांना 521 कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरित केले आहे जून अखेरपर्यंत शेतकऱ्यांना कर्ज वाटप केले जाते.
शेतकऱ्यांसाठी स्थापन झालेल्या जिल्हा भरती जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून हा कर्ज पुरवठा होतो. पीक कर्जाची आणि नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जिल्हा बँकेने तीन लाखांपर्यंतचे कर्ज शून्य टक्के व्याजदराने उपलब्ध करून दिले. एक लाख ते तीन लाखांच्या कर्ज मर्यादेत विहित मुदतीची कर्जाची परतफेड केल्यास एक टक्का व्याजदरसह आणखी दोन टक्के व्याजदर सवलत देण्यात येत होती. मात्र आता केंद्र सरकारने नवीन परिपत्रक काढल्याने तुरदास यावर कोणताही अधीर नाही अजून तरी बँकेने घेतलेला नाही राष्ट्रीयकृत बँकांसह जिल्हा बँकेने मागील वर्षीच्या तुलनेत यंदा बहुतेक पिकांच्या कर्ज वाटपाची मर्यादा वाढवली आहे.
फळ पिकांसाठी किती मिळणार कर्ज
भाजीपाला फळ व फूल पिकांसाठी कर्जाची मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. पपईसाठी 35000 द्राक्ष लागवडीसाठी अडीच लाख टरबूज साठी 25000 संत्री व मोसंबी साठी 70000 डाळिंबासाठी एक लाख रुपये कर्ज निश्चित करण्यात आले आहे. केळी लिंबू व कापसासाठी कर्जाची मर्यादा खूपच कमी असल्याने ती वाढवण्यात यावी अशी अपेक्षा शेतकरी सुभाष पाटील यांनी व्यक्त केली आहे.
---Advertisement---