---Advertisement---
तरुण भारत लाईव्ह । २२ मे २०२३। ज्योतिषशास्त्रानुसार गुरु पुष्य नक्षत्र योग हा २५ मे २०२३ ला जुळून येत आहे. या दिवशी सूर्योदयापासून ते संध्याकाळी ५ वरून ५४ मिनिटांपर्यंत हा राजयोग कायम असणार आहे. कोणत्या शुभ कार्यासाठी हा योग अत्यंत लाभदायक ठरू शकतो. तसेच तुम्हाला एखाद्या नव्या गुंतवणुकीची किंवा खरेदीची संधी लाभत असल्यास गमावू नये. गुरु पुष्य योग बनत असतानाच गुरुदेव हे काही राशींसाठी अत्यंत शुभ ठिकाणी स्थिर झाले आहेत. यामुळे येत्या काळात काही राशींना लाभदायक असा सुवर्णकाळ अनुभवता येऊ शकतो. तर कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
मेष रास
मेष या मंगळाच्या राशीत गुरू-राहू-हर्षल यांचा एकूण सहवास कौटुंबिक सौख्याला त्रासदायक ठरला तरी गुरूची सप्तम स्थानावरील दृष्टी आकाशतत्त्वाच्या नियमाप्रमाणे व्यापक राहील. राहू जरी सोबत असला तरी गुरू आपल्या उद्योगधंद्यात, नोकरीत मदतीचा ठरेल. नोकरीत नवा बदल, नव्या योजना नकोत. २८ नोव्हेंबरनंतर मात्र त्याचा जरूर विचार करा.
कर्क रास
कर्क ही जलरास तशी हळवी, भावविवश होणारी. या राशीचा स्वामी चंद्र. दशमातील गुरू आनंदी, सांसारिक सुख भोगणारा उच्च मनोवृत्तीचा असतो. विशेष म्हणजे मेष राशीतील गुरू राजकारण, सामाजिक क्षेत्रात उद्योगधंद्यात आपले कर्तृत्व उत्तमरीतीने दाखवून देतो. गुरूचे नवमस्थानातील आगमन खूपच आनंददायी ठरेल.
कन्या रास
अष्टमात हर्षल-गुरू-राहू त्यामुळे स्वभावातील एकसूत्रता हरवल्यासारखी जाणवेल. कन्या ही बुधाची बौद्धिक राशी पण या ग्रहाच्या फेऱ्यात आपले अस्तित्व हरवल्यासारखे होते. अष्टमात गुरू कौटुंबिक सुखात लहानसहान गैरसमज, नातेवाईकांचे रुसणे यावर शांत राहणे हा एकमेव रामबाण उपाय ठरेल.