---Advertisement---
महाराष्ट्र वन विभागात नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक खुशखबर आहे. महाराष्ट्र वन विभागाने विविध पदाच्या 2417 जागा भरण्यासाठी भरती जाहीर केली असून यासाठीची जाहिरात काढली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 आहे. पात्र उमेदवार संबंधित
www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतो.
अर्ज प्रक्रिया 10 जून 2023 पासून सुरु होईल. दहावी ते पदवीधर उमेदवारांना नोकरी मिळविण्याची ही मोठी संधी आहे.
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
वनरक्षक- उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (12 वी) ही विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.
अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (10 वी) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.
माजी सैनिक असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (10 वी) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.
नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचा- यांचे पाल्य असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१० वी) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.
लघुलेखक (उच्चश्रेणी) : माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण. लघुलेखनाचा वेग किमान 120 शब्द प्रति मिनिट
इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
लघुलेखक (निम्नश्रेणी)- माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण. लघुलेखनाचा वेग किमान 100 शब्द प्रति मिनिट
इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)- उमेदवाराने शासनाने मान्यता दिलेली तीन वर्ष कालावधीची स्थापत्य अभियंत्रिकी मधील पदविका किंवा तिच्याशी समतुल्य म्हणून मान्यता मिळालेली अशी इतर कोणतीही अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक- उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठाची गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी किंवा सांख्यिकी या विषयात पदव्युत्तर पदवी
किंवा
मान्यता प्राप्त विद्यापीठाची गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी किंवा सांख्यिकी या विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी धारण करणे आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक– उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठाची गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी किंवा सांख्यिकी या विषयात पदवी धारण करणे आवश्यक आहे, मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
सर्वेक्षक- उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१२ वी) उत्तीर्ण केलेली असावी. मान्यता प्राप्त संस्थेचे सर्वेक्षक प्रशिक्षण पाठ्यक्रम प्रमाणपत्र धारण केलेले असावे, मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
लेखापाल- उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणे आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
वयोमर्यादा :
वनरक्षक पदासाठी आवश्यक वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे.
सर्वसाधारण प्रवर्ग: 18 ते 27 वर्षे
मागास प्रवर्ग: 18 ते 32 वर्षे
इतर संवर्गातील रिक्त पदांसाठी वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे.
सर्वसाधारण प्रवर्ग: 18 ते 40 वर्षे
मागास प्रवर्ग: 18 ते 45 वर्षे
---Advertisement---