---Advertisement---

विठ्ठल नामाची शाळा भरली… लक्ष लक्ष नेत्रांनी टिपला रिंगण सोहळा

---Advertisement---

इंदापूर :  जगत् गुरू संत तुकाराम महाराजांच्या  पालखी सोहाळ्यातील दुसरे गोल रिंगण सोहळा शहरातीलतील रयत शिक्षण संस्थेच्या कस्तुराबाई कदम प्रांगणात मोठया उत्साहात पार पडला.हा सोहळा पाहण्यासाठी पंचक्रेशीतील आबाल वृध्द भाविक स्त्री पुरूषांनी मोठी गर्दी केली होती. हा नेत्रदिपक सोहंळा लक्ष लक्ष नेत्रांनी टिपला.

पालखी आगमनानंतर रिंगण सोहळयासाठी कदम विद्यालयाच्या प्रांगणात आणण्यात आली.टाळ मृदगांच्या गजरात पंढरीनाथ हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारामच्या गजरात प्रथम झेंडेकरी, हंड्या वीणेकरी महिला, प्रशासनातील कर्मचारी, अश्वांनी रिंगण पूर्ण केले. यावेळी हरिनामाचा गजर भाविकांनी केला. या रिंगण सोहळ्याचे सुत्रसंचलन सुनिल मोरे व विश्वंभर मोरे यांनी केले.

निमगांव केतकीच्या पान मळ्याच्या परिसरातुन इंदापूरच्या ऊस पट्टयात पालखीचे उत्साहात पावसाची आळवणी करुन स्वागत करण्यात आले.

मुंबई भा.ज.प. अध्यक्ष आशिष शेलार,. खा.राहुल शेवाळे,खा. धनंजय महाडिक, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, निहार ठाकरे, राष्ट्रवादी पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदिप गारटकर, राजवर्धन पाटील, तहसिलदार श्रीकांत पाटील, इंदापूरचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार, मुख्याधिकारी रामराजे कापरे, कर्मयोगी कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, माऊली चवरे,सी.ए. प्रशांत भिसे,शिवसेना ता.प्रमुख महारूद्र पाटील, माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस, प्रशांत पाटील इ. मान्यवराच्या उपस्थितीत पालखीचे स्वागत करण्यात आले.

या वेळी मुकबधिर शाळेच्या विद्यार्थ्यानी काढलेली दिंडी उपस्थित भाविकांचे लक्ष वेधुन घेत होती. शाळेचे मुख्यध्यापक डॉ. अमोल उन्हाळे व त्याच्या सहकार्यानी यासाठी परिश्रम घेतले. यंदा प्रथमच पालखी मुक्कांमासाठी औद्यगिक प्रशिक्षण संस्थेच्या परिसरातील हॉल मध्ये असल्याने शहरात शुकशुकाट जाणवत होता. बारामतीचे प्रांताधिकारी वैभव नावडकर व पोलिस उपअधिक्षक गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पालखीच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment