राष्ट्रवादीच्या कॅलेंडरवर विठुरायाच्या फोटोवर हिरवा चांद आणि बोकड

---Advertisement---

 

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कॅलेंडरवरुन सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. राष्ट्रावादीच्या या कॅलेंडरवर विठुरायाच्या फोटोवर हिरवा चांद आणि बोकडाची प्रतिमा दिसत आहे. राष्ट्रवादीने हिंदूंच्या भावना दुखावण्याचं काम केलं आहे, असा आरोप भाजपाने केला असून या कॅलेंडरचा फोटो शेअर करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

राष्ट्रवादीच्या कॅलेंडरवर, विठुरायाच्या फोटोवर हिरवा चांद आणि बोकड दाखवून राष्ट्रवादीला काय दाखवायचं आहे ? असा संतप्त सवाल भाजपने ट्विट करत उपस्थित होत आहे. तसेच, जाणीवपूर्वक हिंदू धर्मियांच्याच भावना दुखावण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस करत आहे. विठुरायाची ही विटंबना महाराष्ट्र सहन करणार नाही. असा इशाराही भाजपने दिला आहे.

हे कॅलेंडर नागपूर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख दुनेश्वर पेठे यांनी छापले आहे. एकाच दिवशी दोन सण आल्याने वार्षिक कॅलेंडरमध्ये प्रिटिंगदरम्यान अनवधानाने चूक झाली आहे. यात कुणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. यावरून वारकरी, भक्तांच्या भावना दुखावल्या असल्यास दिलगिरी व्यक्त करतो. हा निश्चितच गंभीर विषय असल्याने सणासुदीच्या दिवसात कुणीही यावर राजकारण करू नये, असे आवाहन करत शहराध्यक्षांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---