---Advertisement---

राऊत म्हणजे चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, कुणी सोडले टीकास्त्र

---Advertisement---

मुंबई : संजय राऊत म्हणजे चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट आहे, त्यांच्याकडे तुम्ही गांभीर्याने घेत जाऊ नका, असे टीकास्त्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी खासदार संजय राऊतांवर सोडले आहे.

देसाई पुढे म्हणाले की, आम्ही लोकांची काम करीत आहाेत आणि यापुढं देखील करायची आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले. संजय राऊत यांना आता दुसर काही काम राहिलेलं नाही. रोज सकाळी उठून काहीतरी बोलत राहायचं हे त्यांचं ठरलेलं आहे. आम्हाला लोकांच्यात राहायचं आहे. लोकांची काम करायची आहेत. संजय राऊत यांचं बोलणं तथ्यहीन असते. त्याला कोणताही आधार नसतो. संजय राऊत म्हणजे चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट असल्याचे देसाई यांनी सांगितले.

सध्याच्या राजकीय घडामाेडीवर मंत्री देसाई म्हणाले की, आमचे नेते शिंदे साहेबांनी जाे निर्णय घेतला आहे तो आम्हाला मान्य आहे. आमचे सर्व आमदार 100 टक्के खुश आहेत. कोणीही आमदार नाराज नाही. ते आमच्याकडे आलेले आहेत, परिस्थिती बदललेली आहे त्यामुळे अजिबात नाराजी नाही. आम्हाला शिंदे साहेबांवर पूर्णपणे विश्वास आहे असे ठामपणे मंत्री देसाईंनी नमूद केले.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment