---Advertisement---

किरीट भाईजी यांच्या सान्निध्यात ११ रोजी गुरूपोर्णिमा उत्सव

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह |जळगाव : आचार्य ऋषिवर श्री किरीटभाईजी यांचे सानिध्यात तुलसी परिवार जळगाव यांचेकडून शहरातील श्री छत्रपती संभाजीराजे नाट्यसंकुल येथे ११ जुलै रोजी संध्याकाळी ४ ते ७ पर्यंत गुरूपोर्णिमा उत्सव आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाची सुरूवात गुरूपूजनाने होईल. त्यानंतर ऋषिवरजींचे प्रवचन तथा आशिर्वचन होईल. कार्यक्रमात शंका समाधान, ठाकूरजी पुजन, गुरूदर्शन, गुरूदीक्षा यांचा समावेश आहे.

 

कार्यक्रमानंतर प्रसाद वितरण करण्यात येईल. सर्व महानुभाव, गुरूबंधू भगिनी यांनी उपस्थिती द्यावी अशी विनंती तुलसी परिवारातर्फे करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment