---Advertisement---

शाश्वत शेती : जाणून घ्या तत्वे आणि फायदे

---Advertisement---

शाश्वत शेती म्हणजे काय हे जाणून घेण्याअगोदर अशाश्वत शेतीचा अर्थ, समजून घ्यावा लागेल. अशाश्वत शेती म्हणजे ज्या शेती व्यवस्थापनातून मानवाच्या, पर्यावरणाऱ्या, मुलभूत गरजा पुर्ण होवू शकत नाहीत. उलटपक्षी मानवाचे व पर्यावणाचे आरोग्य धोक्यात येण्याच्या शक्यता वाढून जैवविविधता नष्ट होण्याचा मार्ग निर्माण होत आहे का ? अशी परिस्थिती सर्व अभ्यास व संशोधनातून समोर येते. अशा वेळी अशाश्वतता निर्माण होते. याला पर्याय काय तर शाश्वत शेती (उद्योग).

शाश्वत शेती म्हणजे जमिन, हवामान, निसर्ग, पर्यावरण, वने, पशुधन या संसाधनांचा सुयोग्य पध्दतीने वापर करत ( या स्त्रोतांचा घसारा होवू न देता ) शेती व्यवस्थापनातून वर्तमान व भावी पिढीसाठी व पर्यावरणाच्या संतुलनातून मानवाला आवश्यक असलेल्या अन्न वस्त्रे व निवारा, आरोग्य करीता आवश्यक गुणात्मक व संख्यात्मक शेतमाल उत्पादन करणे म्हणजेच शाश्वत शेती होय.

आपण शाश्वत शेतीला सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, पर्यावरणीय शेती असे देखील संबोधू शकतो. या शेती मध्ये पर्यावरण संतूलनाला विशेष महत्व दिले जाते. शाश्वत शेतीत सेंद्रिय कर्ब पदार्थांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. भारतात अन्न सुरक्षा, पोषण सुरक्षा, मातीचे आरोग्य सुधारणे हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करणे या सारख्या अनेक फायद्यांमुळे शाश्वत शेतीकडे काळाची गरज व आवश्यकता म्हणून पाहिले जात आहे. शाश्वत शेतीमध्ये एकात्मीक किड व्यवस्थापन, पीक रोटेशन, पाणी व्यवस्थापन कर्ब व नत्र संतूलन, रसायनाचा वापर टाळणे, जैव रसायनाचा खतांचा वापर अशा तत्वांचा वापर करून अन्नधान्याचे गुणवर्धक असे उत्पादन घेतले जाते. माती, पाणी, जैवविविधता संवर्धन करण्याच्या विविध नैसर्गिक व जैविक पध्दतीचा वापर करणे आवश्यक आहेत. या संसाधनांचे सरंक्षण करणे शाश्वत शेतीत शक्य आहे. यात ठिंबक सिंचन, पवन टर्बाइन, सौरशक्ती पॅनेल या तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो. शाश्वत सामुदायीक प्रयत्नाने सफल होणार आहे. न्याय्य श्रमशक्ती, समुदायाचा सहभाग, सांस्कृतीक प्राकृतिक परिसंस्थांचे संरक्षण, लहान शेतकऱ्यांना आधार देण्याचा विचार केला जातो. शाश्वत शेतीमध्ये बदलत्या हवामानाशी जवळून घेणे, पारंपारिक वाणांची लागवड करून पोषण सुरक्षा करणे, नविन तंत्रज्ञानाचा वापर करणे अशा उपयुक्त तत्वांचा वापर केला जातो. जमिनीची उत्पादन क्षमता वाढवणे, जमिनीत सुक्ष्मद्रव्यांचा अन्नघटकांचा संचय करणे कमीत कमी पाण्यात जास्त उत्पादन देणाऱ्या वाणांची लागवड करणे, हवामानानुसार लागवड पध्दतीत योग्य बदल करणे, अशा तत्वांचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला जातो.

ते पाहिले जाते. कृत्रिम किटकनाशके, बुरशीनाशके व रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांचा वापर वाढवण्यावर भर दिला जातो. यामुळे पर्यावरण व मानवी आरोग्यांची काळजी घेतली जाणार आहे. माती व पाण्याची गुणवत्ता चांगली असेल तर पोषण तत्वे असणारे पीक उत्पादित करणे अवघड नाही. शाश्वत शेती पध्दतीमुळे सौर व पवन उर्जासारख्या अक्षय उर्जा स्त्रोतांचा अवलंब करून कार्यक्षम सिंचन पध्दती वापरून पारंपारिक शेती मशागत पध्दतींचा अवलंब करून शेती उत्पादन वाढवणे शक्य आहे. कचऱ्यांचे प्रमाण कमी करत कंपोष्ट खताची निर्मिती करून जमिनीची उत्पादन क्षमता व पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवता येणे शक्य आहे.

शाश्वत शेती पध्दतीमध्ये नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर करून माती व पाण्याची गुणवत्ता सुधारून, जैवविविधता टिकवून पर्यावरण समतोल राखून, हवामानातील बदल स्विकारत अन्नधान्यांचे गुणवत्ताधारक उत्पादन करणे आवश्यक आहे व ते परिश्रमाने शक्य आहे.

शाश्वत शेती पध्दती शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांमध्ये व उत्पन्नाच्या विविधता आणण्यात मदत होणार आहे. विविध प्रकारच्या पिकांची लागवड करून शेतकरी एकाच पिकांवरील त्यांचे अवलंबित्व कमी करून बाजारातील भावांचे चढ-उतार यावर नियंत्रण करून जास्त नफा मिळवू शकतात. शाश्वत शेतीमुळे शेतकऱ्यांच्या शेती माल उत्पादन खर्चात कमी करता येणे शक्य आहे. जमिनीची धूप कमी करता येणार आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची थेट स्वत: विक्री करून जास्त भाव मिळवून नफा मिळू शकतो.

शेवटी एकच सांगेन, शाश्वत शेती पध्दतीमध्ये भारतातील शेतीत क्रांती घडवण्याची क्षमता आहे. जैवविविधता, नुतनीकरणीय नैसर्गिक संसाधने, जळसंवर्धन आर्थिक स्थिरता यांना प्राध्यान देवून शेतकरी आत्मनिर्भर अधिक लवचिक आणि अधिकाधिक भरभराट करणारी परिसंस्था निर्माण करू शकतात.

आत्मनिर्भर किसान ! समर्थ विकसीत ग्राम !! वैभवशाली भारत !!!

श्री. केदारनाथ कवडीवाले
सिनेट सदस्य
कवयित्री बहिणाबाई चौधरी
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment