---Advertisement---

किरीट सोमय्या प्रकरण : गृहमंत्री फडणवीसांचं सभागृहात उत्तर, काय म्हणाले…

---Advertisement---

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे खळबळ माजली असून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहात या प्रकरणी चौकशीची मागणी केली. ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी देखील हा विषय सभागृहात मांडला. यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात उत्तर दिल आहे.

काय म्हणाले फडणवीस?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “हा विषय अतिशय गंभीर आहे. राजकारणात असे अनेक प्रसंग येतात ज्यामुळे माणसाचे सर्व राजकीय आयुष्य पणाला लागतं. माझ्याकडे तक्रारी द्या मी चौकशी करतो. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होईल. ती महिला कोण आहे, हे जाहीर करणार नाही. मात्र कुणालाही पाठीशी घालणार नाही.

“आम्ही वरिष्ठ स्तरावर चौकशी करणार आहोत. अनिल परब यांनी मांडलेला विषय गंभीर आहे. कोणतही प्रकरण दाबल्या जाणार नाही. कायद्याच्या चौकटीत राहून तपास केला जाईल”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment