तरुण भारत लाईव्ह | जळगाव : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी भाजपा केमिस्ट फार्मासिस्ट आघाडीची प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली.
या कार्यकारिणीत प्रदेश सहसंयोजकपदी सुनील भंगाळे तर उत्तर महाराष्ट्र विभागीय सहसंयोजकपदी संजय नारखेडे आणि दशरथ वाणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपा वैद्यकीय आघाडीची प्रदेश कार्यकारिणी तसेच केमिस्ट फार्मासिस्ट आघाडीची प्रदेश कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अजित गोपछडे यांच्याकडे दोन्ही आघाड्यांचे प्रदेश प्रभारी पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. वैद्यकीय आघाडीचे संयोजक म्हणून डॉ. बाळासाहेब हरपळे व… pic.twitter.com/f79FtD27CB
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) July 20, 2023