---Advertisement---
तरुण भारत लाईव्ह | १६ डिसेंबर २०२२ | संपूर्ण जगातील माहितीचा खजाना म्हणून गुगलची (Google) ओळख आहे. आपणास कोणतीही माहिती हवी असल्यास गुगल कर, असे सहजपणे म्हटले जाते. गुगल शिवाय तंत्रज्ञान विश्वाची कल्पनाच करता येणार नाही. मात्र आता गुगलला टक्कर देण्यासाठी एका नव्या व अत्याधुनिक टूलची एंट्री झाली आहे. एआय वर आधारित हे टूल गुगलपेक्षा खूपच सरस मानले जात आहे. या टूलचे नाव आहे चॅट जीटीपी (ChatGTP) चॅट जीटीपी तुमच्या शोधावर फक्त लिंक देऊन तुम्हाला कन्फ्युज करत नाही, तर तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे ठोस असे उत्तर देते.
येत्या काळात तुमची शोधण्याची पद्धत आणि शोध इंजिनच्या काम करण्याची पद्धत देखील बदलणार आहे. किंवा ते एका प्रकारे बदलले आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. कारण, Google शोध किलरची एंट्री झाले आहे.ज्याचे नाव ChatGPT आहे. ChatGPT म्हणजे जनरेटिव्ह प्री ट्रेनेड ट्रान्सफॉर्मर. आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिसर्च कंपनी OpenAI ने AI आधारित चॅटबॉट ChatGPT सादर केला आहे.
गुगलवर आपण जेंव्हा एखादी माहिती शोधतो तेंव्हा गुगल त्या संबंधित प्रसिध्द झालेल्या माहितीच्या अनेक लिंक उपलब्ध करुन देतं. यातून आपल्याला आपल्या कामाचं काय आहे? याचा शोध घ्यावा लागतो. मात्र ChatGPT ची पद्धत गुगल सर्चपेक्षा खूप वेगळी आहे. चॅट जीपीटीवर तुमच्या प्रश्नांची उत्तरे इंटरनेटद्वारे उपलब्ध नाहीत. म्हणजेच, चॅट जीपीटी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी इंटरनेटवर शोधत नाही. पण, हे टूल तुमच्या प्रश्नाचे उत्तर तयार करुन देते. चॅट जीटीपीत दिलेला डेटा मजकूर आधारित आहे आणि पुस्तके, वेब मजकूर, विकिपीडिया आणि इतर लेखांमधून घेतलेला आहे.
ChatGPTचे काही दिवसांतच त्याचे लाखो युजर्स झाले आहेत. चॅट जीपीटी तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्नांची अगदी अचूक उत्तरे देते. चॅट जीपीटी फक्त एक चॅटबॉट असले तरी, त्याची क्षमता चॅट बॉट आणि सर्च इंजिनपेक्षा खूप जास्त आहे. जे काम तुम्ही गुगल सर्चवर तासांत करू शकत नाही, ते काम ChatGPT काही मिनिटांत किंवा काही सेकंदांत करते. यामुळे चॅट जीटीपी गुगलला मोठी स्पर्धा निर्माण करेल, असे तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञांचे म्हणणे आहे.
---Advertisement---