---Advertisement---
आत्तापर्यंत तुम्ही पट्टेदार, पिवळ्या, तपकीरी रंगाचे वाघ पाहिले असेल पंरतु, आता तुम्ही मेलेनिस्टिक वाघ पाहणार आहात. मेलेनिस्टिक वाघ म्हणजे अनुवांशिक बदलामुळे त्वचेचा रंग बदलतो. अशा दुर्मिळ मेलेनिस्टिक वाघाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
मेलेनिझम असलेले प्राणी खूप त्वचेत मेलेनिन तयार झाल्याने काळ्या रंगाचे होतात. मेलेनिझम जवळजवळ सर्वच सस्तन प्राण्यात आढळत असतो. या प्राण्याच्याा त्वचेवर किंवा केसांवर काळे पट्टे आढळतात. त्वचेवर डार्क पिग्मेटेशन झाल्याने असा प्रकार होतो. इंडीयन फोरेस्ट सर्व्हीस ( आयएफएस ) ऑफीसर रमेश पांडे यांनी एका दुर्मिळ मेलेनिस्टिक वाघाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
हा व्हिडीओ ओदिशातील सिमिलीपल टायगर रिझर्व्हमधील आहे. ट्वीटरवर शेअर केलेल्या या व्हिडीओला रमेश पांडे यांनी कॅप्शन दिली आहे, “ओदिशातील सिमिलीपल टायगर रिझर्व्हमधील मेलेनिस्टिक टायगरचा हा दुर्मिळ व्हिडीओ पाहा. वाघांच्या संख्येतील वांशिक उत्प्रेरकांमुळे काळ्या रंगाचा पट्टेरी वाघ केवळ येथेच आढळतो.”
हा काळ्या रंगाच्या वाघाचा व्हिडीओ एक ऑगस्ट रोजी पोस्ट केला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 70 हजार लोकांनी पाहीला आहे. तर 293 युजरनी या व्हिडीओला रिट्वीट केले आहे. तर एक हजार लोकांनी त्याला लाईक केले आहे.









