---Advertisement---

रुग्णांना मोठा दिलासा : गंभीर आजारांवरील औषधे झाली स्वस्त

---Advertisement---

नवी दिल्ली : कॅन्सर, डायबिटिस, ताप आणि हेपेटायटिससह ११९ आजारांवरील उपचारांसाठी वापरण्यात येणार्‍या औषधांचे दर ४० टक्क्यांपर्यंत घटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. येत्या काळात आणखी काही औषधांचा समावेश हा नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग अ‍ॅथॉरिटी (एनएलईएम) मध्ये करून त्यांच्या कमाल किमती निश्चित करण्याचा केंद्राचा विचार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग अ‍ॅथॉरिटीच्या बैठकीमध्ये या यादीत समावेश असलेल्या ११९ प्रकारच्या फॉर्म्युलेशनवाल्या औषधांची कमाल किंमत प्रति टॅबलेट आणि कॅप्सुलबाबत निश्चित करण्यात आली आहे. ज्या मुख्य औषधांचे दर कमी करण्यात आले आहेत. त्यामध्ये तापावरील औषध पॅरासिटामॉल आणि मलेरियामधील औषधांमध्ये उपचारांसाठी वापरण्यात येणारं औषध हायड्रोक्सीक्लोरोक्विन यांचा समावेश आहे.

टेमोझोलोमाइड – आताची किंमत ६६२.२४ रुपये, नवी किंमत ३९३.६
एलोप्युरिनॉल – आताची किंमत ८.१ रुपये, नवी किंमत ५.०२ रुपये
सोफोसबुवीर – आताची किंमत ७४१.१२ रुपये, नवी किंमत ४६८.३२ रुपये
लेट्रोझोल – आताची किंमत ३९.०३, नवी किंमत २६.१५ रुपये
क्लेरिथोरोमाइसिन – आताची किंमत ५४.८ रुपये, नवी किंमत ३४.६१ रुपये
हेपरिन – आताची किंमत २४.३९ रुपये, नवी किंमत १८.९२ रुपये
फ्लुकोनाझोल – आताची किंमत ३४.६९ रुपये, नवी किंमत २६.५३ रुपये
मेटफोर्मिन – आताची किंमत ४ रुपये, नवी किंमत ३.११ रुपये
सोफिक्सिम – आताची किंमत २४.५ रुपये, नवी किंमत १९.७१ रुपये
पॅरासिटामोल – आताची किंमत २.०४ रुपये, नवी किंमत १.७८ रुपये
हायड्रोक्सिक्लोरोक्विन – आताची किंमत १३.२६ रुपये, नवी किंमत १२.३१

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment