---Advertisement---

प्लास्टिकच्या पिशवीत लपवून ठेवल्या तलवारी, पोलिसांनी टाकला छापा

---Advertisement---

जळगाव : बेकायदेशीरित्या लपवून ठेवलेल्या तीन तलवारी पोलिसांनी छापा टाकत हस्तगत केल्या आहे. यासोबतच तरुणाला ताब्यात घेणयात आले असून  पिंपळगाव हरेश्वर पोलीसात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षल विनोद राजपूत (वय-२०) रा.मोहाडी ता.पाचोरा असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

पाचोरा तालुक्यातील मोहाडी गावात हर्षल विनोद राजपूत हा त्याच्या घरात प्लास्टिक पिशवीमध्ये तीन तलवारी लपवून ठेवल्याची गोपनीय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. बुधवार, ३० रोजी दुपारी ३ वजाता पथकाने कारवाई करत १० हजार रुपये किंमतीच्या तीन तलवारी हस्तगत केले.

सपोनि निलेश राजपूत, पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, गणेश चौबे, सहाय्यक फौजदार अनिल जाधव, पोलीस हेडकॉन्स्टेबल नंदलाल पाटील, महेश महाजन, गोरख बागुल, संदीप सावळे, प्रीतम पाटील, जयंत चौधरी, अनिल देशमुख, पोलीस नाईक भगवान पाटील, हेमंत पाटील, ईश्वर पाटील, किरण चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल उमेश गोसावी, लोकेश माळी, चालक पोलीस नाईक अशोक पाटील, पोलीस कॉन्स्टेबल प्रमुख ठाकूर, मोतीलाल चौधरी या पथकाने ही कारवाई केली.

 

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment