---Advertisement---

जाणून घ्या! दहीहंडीचे महत्व आणि इतिहास

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह । ७ ऑगस्ट २०२३। दहीहंडी ज्याला गोपाळ कला असही म्हटल जात. आज अनेक ठिकाणी दहीहंडी साजरा केली जाणार आहे. हा भारतातील एक मनोरंजन तसेच स्पर्धात्मक कार्यक्रम आहे. जो कृष्ण जन्माष्टमी कृष्णाचा जन्म साजरा करणाऱ्या हिंदू सणाशी संबंधित आहे. दहीहंडी साजरा करण्याची पद्धत आणि या सणाचा इतिहास काय आहे हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

बाळगोपाळ श्रीकृष्णाच्या जन्मानिमित्ताने दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. श्रीकृष्णाला बालपणी दही, दूध, लोणी या पदार्थांची आवड होती. कृष्णापासून दह्याचे रक्षण व्हावे यासाठी यशोदा दह्याची हंडी उंच ठिकाणी किंवा शिक्यावर ठेवत असे पण श्रीकृष्ण तिथपर्यंत पोहचण्यात यशस्वी होत असे. यासाठी त्याचे, मित्र त्याला मदत करत असत. या घटनेची आठवण म्हणून सर्वत्र दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो.

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडीचे आयोजन केले जाते. या दिवशी मातीच्या मडक्यात दही, लोणी, मिठाई, फळे इत्यादी भरुन एका उंच ठिकाणी हे मडके टांगले जाते. हंडी फोडण्यासाठी विविध तरुण मंडळी प्रयत्न करतात. दहीहंडी फोडण्यासाठी विविध मंडळातील तरुण एक दुसऱ्याच्या पाठीवर चढून मानवी मनोरा तयार करतात. या मनोऱ्याच्या सर्वात वरच्या थरावर असतो त्याला गोविंदा म्हणतात. तो सर्व थर पार करता आपला तोल सांभाळत हंडी फोडतो. हंडी फोडणाऱ्या मंडळांना विविध भेटवस्तू देऊन गौरविण्यात येते. मुलांप्रमाणेच मुली देखील धाडस दाखवून थरांवर थर लावून हंडी फोडतात.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---