---Advertisement---
जळगाव : वेगवेगळ्या कारणांवरून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा प्रकार जळगाव शहरातील दिनकर नगरात घडला. याप्रकरणी विवाहित महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून महिलेच्या पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात शनिपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.
जळगाव शहरातील दिनकर नगरातील रहिवासी नूतन पंकज बाविस्कर यांचा चोपडा तालुक्यातील मामलदे येथील येथील पंकज नवल बाविस्कर यांच्याशी विवाह झाला आहे. लग्नानंतर काही दिवस चांगले गेल्यावर नूतन हिचा पतीसह सासरच्यांनी वेगवेगळ्या कारणांवरुन वेळावेळी शिवीगाळ तसेच मारहाण करत शारिरीक व मानसिक छळ केला.
या छळाला कंटाळून नुतन ही जळगावात माहेरी निघून आली व तिने या छळाबाबत रविवारी शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली, या तक्रारीवरुन नूतनचे पती पंकज बाविस्कर, सासरे नवल सिताराम बाविस्कर, सासू खटाबाई नवल बाविस्कर, सर्व रा. मामलदे, ता चोपडा , मावस सासू आशाबाई रामचंद्र कोळी रा, खेडी आव्हाणा अशा पाच जणंविरोधात गुन्हा दाखल झाला आहे, पुढील तपास पोलीस नाईक मनोज येऊलकर हे करीत आहेत.
---Advertisement---