---Advertisement---

कत्तलीपूर्वीच पाच गुरांची सुटका, चार संशयित ताब्यात; जळगाव जिल्ह्यातील घटना

---Advertisement---

जळगाव : गुरांची अवैध व निदर्यपणे होणाऱ्या वाहतुकीविरोधात पोलिसांनी कारवाई मोहीम राबविली. त्यानुसार आज एका वाहनावर कारवाई झाली. यात पाच गुरांची सुटका केली. या प्रकणी भडगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

भडगाव तालुक्यातील गिरड गावातील सरकारी दवाखान्याजवळ छोटा हत्ती वाहन क्रमांक (एमएच ४८ टी ७४०४) यात पाच गुरांना निर्दयतने कोंबून त्यांची कत्तलीसाठी घेवून जात असतांना काही ग्रामस्थांच्या लक्षात आले. त्यांनी वाहन थांबवून भडगाव पोलीसांना कळविले. त्यानुसान पोलीसानी घटनास्थळी धाव घेवून वाहन ताब्यात घेत पाच गुरांची सुटका करण्यात आली.

याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात संशयित आरोपी समीर खान फिरोज खान, गाडी मालक अयुब शेख युसूब शेख दोन्ही रा. पाचोरा, गुरांचे मालक (नाव गाव माहित नाही) आणि प्रभाकर चुडामन पाटील रा. गिरड ता. भउगाव या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ हिरालाल पाटील करीत आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment