---Advertisement---

Devendra Fadnavis : पूरग्रस्त भागाचा दौरा करत घेतला आढावा

---Advertisement---
महाराष्ट्र : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील पूरग्रस्त भागांना भेट दिली असून येथील पूरस्थितीचा आढावा घेतला. नाग नदीला आलेल्या महापुरामुळे सुमारे दहा हजार घरांचे नुकसान झाले आहे. घरात पाणी शिरल्यामुळे घरगुती साहित्य तसेच अन्नधान्य भिजले असून घरातील चिखल काढण्यासाठी नागरिकांना मदत करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

 

तसेच, चार तासात जोरदार पावसामुळे अंबाझरी परिसरातील नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरल्यामुळे अन्नधान्यासह इतर साहित्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी फडणवीस यांनी केली. डागा लेआउट, कार्पोरेशन कॉलनी, शंकर नगरसह इतर वस्त्यांना भेट देऊन येथील नागरिकांशी संवाद साधला. तसेच घरात चिखलामुळे झालेल्या नुकसानीचीही पाहणी केली.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment