---Advertisement---

पीएम मोदींचा ‘हा’ व्हिडिओ तुमचं मन जिंकेल!

---Advertisement---

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत आल्यानंतर महात्मा गांधी जयंती म्हणजेच, २ ऑक्टोबर हा दिवस स्वच्छता दिन म्हणून घोषित केला. या दिवसापासून भारतात स्वच्छता अभियान सुरू केले. या दिवशी पंतप्रधान मोदींनी संपूर्ण देशाला स्वच्छता अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले होते आणि एक तास स्वच्छतेसाठी देण्यास सांगितले होते.

त्यानुसार, पंतप्रधानांनी आज भारतीय कुस्तीपटू अंकित बैयनपुरियासह संपूर्ण देशाला स्वच्छतेचा संदेश दिला. त्यांनी अंकितसोबत क्लीनअप केले आणि अंकितकडून त्याच्या फिटनेसचे रहस्यही जाणून घेतले. पंतप्रधानांच्या अधिकृत ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये मोदी आणि अंकित एकत्र आहेत आणि एका पार्कची स्वच्छता करत आहेत. या व्हिडिओमध्ये अंकित आणि पंतप्रधान स्वच्छतेसोबतच फिटनेसबद्दल बोलत आहेत.

या व्हिडिओमध्ये पंतप्रधानांनी अंकितच्या फिटनेसचे कौतुक केले आहे आणि त्याच्या शेड्यूलबद्दलही विचारले आहे. 75 दिवसांच्या कठीण आव्हानामुळे अंकित प्रसिद्ध झाला. मोदींनीही त्यांच्याशी याबद्दल बोलून हे आव्हान काय आहे हे जाणून घेतले. अंकित ‘राम-राम सरण्ये’ म्हणत सोशल मीडियावर पोस्ट केलेला व्हिडिओ सुरू करतो. असे म्हणत मोदींनी या व्हिडिओला सुरुवातही केली. त्यानंतर दोघेही उद्यानाची स्वच्छता करू लागले.

यानंतर मोदींनी त्यांना स्वच्छता मोहिमेबद्दल विचारले आणि स्वच्छतेबाबत अंकित जिथून येतो त्या सोनीपतच्या लोकांचा दृष्टिकोन काय आहे हे जाणून घेतले. यावर अंकित म्हणाला की, आता लोक जास्त सक्रिय झाले आहेत. यानंतर मोदींनी अंकितच्या फिटनेसबद्दल आणि तो त्याच्या फिटनेससाठी किती वेळ देतो याबद्दल विचारले, त्यावर अंकिताने सांगितले की, मी या फिटनेससाठी तीन ते चार तास देतो. पंतप्रधानांनी अंकितच्या फिटनेसचे कौतुक केले.

दरम्यान अंकितने सांगितले की, आपले पंतप्रधानांना भेटण्याचे स्वप्न होते जे पूर्ण झाले आहे. अंकित म्हणाला की पंतप्रधानांनी खेळाबाबत बरेच काही केले आहे, खेलो इंडिया, फिट इंडिया अभियान सुरू केले आहे, ज्यामुळे देशातील अनेक खेळाडूंना प्रेरणा मिळाली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment