---Advertisement---

“पैसे आण, नाहीतर किडनी विक” पतीची धकमी; विवाहितेनं थेट… काय घडलं?

---Advertisement---

जळगाव : पैशांसाठी विवाहितेला चक्क किडनी विकून देण्याची धमकी देत, छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भडगाव तालुक्यातील भोरटेक येथे ही घटना घडलीय. या प्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भडगाव तालुक्यातील भोरटेक येथील माहेर असलेल्या वृषाली जितेंद्र पाटील (२५) यांचा विवाह. जितेंद्र ज्ञानेश्वर पाटील यांच्याशी रितीरिवाजानुसार झालेला आहे. लग्नाचे सुरूवातीचे काही दिवस चांगले गेले. त्यानंतर विवाहितेला पाच लाखांची मागणी करण्यात आली.

दरम्यान, पैशांची पुर्तता न झाल्याने तिला मारहाण करून छळ करण्यात आला. तसेच पैसे आणले नाही तर तुझी किडनी विकून देईल, अशी धमकी देण्यात आली. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. त्यानंतर भडगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली.

त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती जितेंद्र ज्ञानेश्वर पाटील, सासरे ज्ञानेश्वर नारायण पाटील, सासू हिरकणबाई ज्ञानेश्वर पाटील, सर्व रा. अमळनेर यांच्या विरोधात भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस कॉन्स्टेबल पंचशिला निकम यांनी हे करीत आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment