Girish Mahajan : तर ही बाब गंभीर, ‘त्या’ रुग्णांच्या मृत्यूची होणार चौकशी

---Advertisement---

 

नांदेड : सोमवारी नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात २४ तासांत २४ मृत्यू झाले आहेत. अजूनही हा मृत्यूचा तांडव सुरु असून मृतांचा आकडा ३१ वर पोहोचला आहे. या सगळ्या प्रकारावर आता भाजपचे नेते गिरीष महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी गिरिष महाजन म्हणाले की, “५०० बेडचे हे रुग्णालय आहे आणि जवळपास ७५० रुग्ण तिथे अॅडमिट आहेत. त्यामुळे गर्दी खूप असते आणि कोणालाच नाही म्हणता येत नाही. परंतु, २४ हा आकडा छोटा नाही. एका दिवसात २४ रुग्ण दगावत असतील तर ही बाब गंभीर आहे,” असे ते म्हणाले.
त्यामुळे हे कशामुळे झालं, याचं कारण काय यासंदर्भात चौकशी करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेले आहेत. याची सविस्तर चौकशी करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकारी तिथे गेलेले आहेत, असेही त्यांनी सांगितले. तसेच रुग्णांच्या मृत्यूच्या कारणांची चौकशी केली जाणार असल्याचे आश्वासन गिरिश महाजन दिले आहे. यासाठी चौकशी समिती नेमण्यात आली आहे. या चौकशीचा अहवाल आल्यानंतर याबाबतीत स्पष्टता येईल, असेही ते म्हणाले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---