---Advertisement---

अजित पवार गटाचा सर्वात मोठा दावा, वाचा काय म्हणाले?

---Advertisement---
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगात राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावरील सुनावणी सुरु आहे. अजित पवार गटाचे वकील नीरज किशोर कौल यांच्याकडून सुरुवात करण्यात आली. शरद पवारांनी सर्व नियम पायदळी तुडवले, असा दावा अजित पवार गटाने केला.
अजित पवार गटाने बहुसंख्य आमदार आमच्यासोबत असल्याचं सांगितलं आहे. पण बहुसंख्य आमदार कोण आहेत? ते सांगा, असा युक्तिवाद अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितलं आहे.
विधीमंडळातील बहुमत आमच्याकडे असे अजितदादा गटाचे म्हणणे आहे. त्याचा विचार करुनच निर्णय घ्यावा लागेल. राज्य आणि देशातील पदाधिकारी आमच्यासोबत आहेत, असा युक्तिवाद अजित पवार गटाने केला आहे. अजित पवार गटाकडून शिवसेना आणि सादिक अली प्रकरणाचा दाखला देण्यात आला आहे. शरद पवारांनी आपलं घर चालवलं तसाच पक्ष चालवला. शरद पवारांनी सर्व नियम पायदळी तुडवले, असा दावा अजित पवार गटाने केला.
पक्षाची घटना आणि कायद्यानुसार निर्णय झाला नाही. पक्षाची घटना आणि घेतलेले निर्णय यात तफावत आहे, असा युक्तिवाद अजित पवार गटाने केला. यावेळी अजित पवार गटाचे वकील मनिंदर सिंह यांनी पक्षाची घटना वाचवून दाखवली.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment