---Advertisement---
जेरुसलेम : इस्रायल हा ज्यू लोकांचा देश आणि बाजुला सर्व मुस्लिम देश आहेत. आता पॅलेस्टाईन देशातील हमास ही दहशतवादी संघटना आणि इस्रायलमध्ये घणघोर युद्ध सुरु झाले आहे. या युध्दात सर्व मुस्लिम देशांनी इस्रायलविरोधी प्रतिक्रिया देत हमास आणि पॅलेस्टाईनची बाजू घेतली आहे. हेच देश हमासचे आर्थिक पुरवठादार आहेत. असे असताना या मुस्लिम देशांपैकी दोन देश इस्रायलच्या बाजुने उभे ठाकल्याने आखाती भागात खळबळ उडाली आहे.
संयुक्त अरब अमीरात (UAE) आणि बहारीनने हमासच्या हल्ल्याची कठोर शब्दांत निंदा केली आहे. यूएई आणि बहरीनसह सर्व मुस्लिम देशांनी एकेकाळी इस्रायलशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवले नव्हते. परंतू, अमेरिकेच्या मध्यस्थीने २०२० मध्ये इस्रायलसोबत राजनैतिक संबंध स्थापन झाले. यासाठी अब्राहम करार करण्यात आला होता.
आता राजनैतिक संबंध प्रस्थापित होऊन तीन वर्षांनी हमास आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू झाले आहे. या दोन्ही देशांचा दृष्टिकोन इतर अरब देशांपेक्षा वेगळा दिसत आहे. हमासच्या हल्ल्याबाबत इस्रायलच्या समर्थनार्थ उभे ठाकले आहेत. या लढाईला हमास जबाबदार आहे. पॅलेस्टिनी गट हमासने इस्रायली शहरांवर केलेले हल्ले अत्यंत गंभीर असून त्यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला आहे, असे युएईने म्हटले आहे. नागरिकांचे त्यांच्या घरातून अपहरण करून त्यांना ओलीस ठेवल्याचा निषेध करतो, असे बहारीनने म्हटले आहे.