---Advertisement---

प्रेयसीच्या घरात घुसला प्रियकर, कुटुंबीयांनी बेदम मारहाण केली अन् थेट प्रायव्हेट पार्ट…

---Advertisement---

प्रेयसीला भेटण्यासाठी गुपचूप आलेल्या एका तरुणाला बेदम मारहाण करून त्याचे गुप्तांग कापल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित तरुणाने प्रेयसीचा भाऊ आणि आई-वडिलांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सध्या जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. तक्रारीच्या आधारे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणाचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याची तक्रार तरुणाच्या कुटुंबीयांनी केली आहे. तर मुलीचे कुटुंबीय त्यांचे नाते मान्य करण्यास तयार नव्हते. दरम्यान, पीडित तरुण तरुणी भेटण्यासाठी आला असता त्याला बेदम मारहाण करत त्याचे बोट व गुप्तांग कापले. दुसरीकडे, तरुणीच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की, हा तरुण गुपचूप त्यांच्या घरात घुसला होता आणि तरुणीसोबत अश्लील कृत्य करताना त्याला पकडले होते.

तरुणाला जागीच पकडून बेदम मारहाण करण्यात आली आणि त्याला धडा शिकवण्यासाठी त्याचे गुप्तांग कापण्यात आले. तरूणीच्या कुटुंबीयांनी तिच्या गळ्यातील चेन आणि बोटातील अंगठी हिसकावून घेतल्याचा आरोप पीडित तरुणाच्या कुटुंबीयांनी केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुला-मुलीचे वडील व्यापारी आहेत. दोन्ही पक्षांनी प्रथम आपापसात हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रकरण न मिटल्याने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीच्या आधारे पोलीस तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीच्या घरातून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत तरुण घरी पोहोचला होता, तेथून त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्यात आले. सध्या पोलीस तरुणाच्या सावरण्याची वाट पाहत आहेत. तरुणाचा जबाब नोंदवून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये ही घटना घडलीय.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---