---Advertisement---

मोठी बातमी! शरद पवारांना मोठा धक्का?, बड्या नेत्याच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ

---Advertisement---

अजित पवार गटाचे 15 आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. जयंत पाटील यांच्या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे अजित पवार गटाला खिंडार पडणार असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या.

अजितदादा गटाचे कोणते आमदार शरद पवार यांच्या गटात सामील होणार अशी चर्चा रंगायलाही लागली. मात्र, ही चर्चा रंगण्यापूर्वीच अजितदादा गटाच्या एका मंत्र्याने मोठा दावा करून एकच खळबळ उडवून दिली आहे. जयंत पाटीलच आमच्या संपर्कात आहेत, असा दावाच या नेत्याने केल्याने खळबळ उडाली आहे.

राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांनी मीडियाशी संवाद साधताना हा गौप्यस्फोट केला. जयंत पाटील हे आमच्याकडे सुद्धा येऊ शकतात. ते आमच्या संपर्कात आहेत. त्यांचं आणि आमच्या वरिष्ठ नेत्यांचं बोलणं सुरू आहे.

आठ आमदारांसह ते आमच्या पक्षात सामील होतील, असा दावा धर्मरावबाबा अत्राम यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. जयंत पाटील खरोखरच अजितदादा गटात जाणार का? अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment