---Advertisement---

बाहेर तूर आत गांजा! जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्याची करामत पाहून पोलीसही चक्रावले

---Advertisement---

Crime News : तुरीच्या पिकामध्ये गांजाची लागवड केल्याचा प्रकार जळगाव जिल्ह्यात समोर आला आहे. पोलिसांनी तब्बल ८ क्विंटल ओला गांजा जप्त केला आहे. मात्र, संशयित आरोपी पसार झाला असून, या प्रकरणी चोपडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

चोपडा तालुक्यातील उत्तमनगर येथे रवी किलाऱ्या पावरा (२५) याने तुरीच्या शेतात आंतरपीक म्हणून गांजाची लागवड केल्याची गुप्त माहिती चोपडा ग्रामीण पोलिसांना मिळाली. त्यानुसार २३ रोजी दुपारी  ४.३० वाजेच्या सुमारास शेतात धाड टाकली. यात तुरीच्या शेतामध्ये आंतरपीक असलेल्या ओल्या गांजाची झाडे कापून सुमारे ८ क्विंटल वजन असलेला ओला गांजा जप्त केला आहे.

नायब तहसीलदार सचिन बांबळे यांनी पंचनामा केला, तर सरकारी पंच म्हणून कनिष्ठ अभियंता बालाजी दहीफळे यावेळी उपस्थित होते. दरम्यान, ही कारवाई झाली तेव्हा रवी किलाऱ्या पावरा फरार झाला. त्याच्या अल्पवयीन भावाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलीस उपअधीक्षक सुनील नंदवालकर, ग्रामीण पो.नि. कावेरी कमलाकर, सहा फौ. देविदास ईशी, पोहेकॉ राकेश पाटील, किरण पाटील, पोकॉ रावसाहेब पाटील, प्रमोद पारधी, विशाल जाधव, दिलीप पाटील आदींनी ही कारवाई केली.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment