---Advertisement---

अवैध दारू बनवण्याचं डोक्यात घुसलं भूत; आखला मोठा प्लॅन, पण अडकले पोलिसांच्या जाळ्यात

---Advertisement---

नंदुरबार : अवैध दारु बनविणेकामी उपयोगी पडणारे व मानवी शरीरास अपायकारक असलेले 2 लाख 04 हजार 750 रुपये किमतीचा स्पिरीट, 8 लाख रुपये किंमतचे वाहन जप्त करण्यात पोलीसांना यश आले. म्हसावद ता. शहादा मार्गे धडगांव येथे ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहादा ते धडगाव रस्त्यावरील म्हसावद पोलीस ठाणे हद्दीतील येणाऱ्या वाहनाची तपासणी केली. दरम्यान, एका वाहनात  2 लाख 04 हजार 750 रुपये किमतीच्या 09 प्लास्टीकच्या गोण्या त्यात प्रत्येकी 13 असे एकूण 117 पाऊच त्यात एकुण 585 लीटर दारु बनविणेकामी उपयोगी पडणारे स्पिरीट. 8 लाख रुपये किमतीची एक पांढऱ्या रंगाची महिंद्रा बोलेरो वाहन क्रमांक MH-12 EG-4773 असा एकुण 10 लाख 04 हजार 760 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने कायदेशीर प्रक्रिया करुन सदरचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून वाहन सोडून पळून गेलेले संशयीत आरोपीतांविरुध्द् म्हसावद पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 344/2023 भारतीय दंड विधान कलम 328 (मानवी शरीरास अपायकारक पदार्थ निर्मित करणे), महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (ई), 108 सह प्रमाणे महाराष्ट्र मोटार वाहन कायदा कलम 239 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच गुन्ह्यातील फरार आरोपीतांना लवकरच शोधून बेड्या ठोकण्यात येतील व त्यांचेविरुध्द् कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी सांगितले.

नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, म्हसावद पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक राजन मोरे, पोलीस हवालदार बहादुर भिलाला, पोलीस नाईक विकास कापुरे, पुरुषोत्तम सोनार, अविनाश चव्हाण, दादाभाऊ साबळे, योगेश कोळी, पोलीस अंमलदार दिपक न्हावी, अभिमन्यु गावीत यांच्या पथकाने हि कारवाई केली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---