---Advertisement---

Jalgaon : आज सोने-चांदीत जोरदार वाढ, दर वाचून ग्राहकांना फुटेल घाम

---Advertisement---

जळगाव । गेल्या काही दिवसापूर्वी सोन्यसह चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाली होती. मात्र मागील आठ दिवसांपासून दोन्ही धातूंच्या दरात सतत घसरण पाहायला मिळाली परंतु, आज सोने चांदीच्या किमतीत जोरदार वाढ झाली. आज जळगाव सराफ बाजारात चांदीच्या दरात तब्बल ३ हजार रुपयाची वाढ झाली तर सोने १२०० रुपयांनी वधारले आहे. ऐन लग्न सीजनच्या काळात दर वाढल्याने खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे बजेट कोलमडले आहे

गेल्या काही दिवसापूर्वी जळगावच्या बाजारात विनाजीएसटी ६४ हजार रुपयाच्या विक्रमी पातळीवर गेलेल्या सोन्याच्या दरात काल बुधवारी २८०० रुपयांची घसरून दिसून आली.मात्र आज गुरुवारी सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली. चांदीही महागली.

जळगावच्या बाजारात विनाजीएसटी ६४ हजार रुपयाच्या विक्रमी पातळीवर गेलेल्या सोन्याच्या दरात काल बुधवारी २८०० रुपयांची घसरण झाली होती. यापूर्वी गेल्या आठवड्यात घसरण झाली होती. त्यामुळे बुधवारी सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ६१ हजार ३०० रुपयावर आला होता. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला होता.

मात्र आज गुरुवारी जळगावच्या बाजारात सोन्याचे दरात तब्बल १२०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे आज सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव विनाजीएसटी ६२,३०० रुपयांवर गेला.दरम्यान, आज चांदीच्या किमतीत देखील तब्बल ३ हजार रुपयाची वाढ झाली. या वाढीनंतर चांदीचा एक किलोचा विनाजीएसटी दर 75 हजार रुपये झाले आहेत. ऐन लग्न सीजनच्या काळात दर वाढल्याने ग्राहकांचे बजेट विस्कळित झाले आहे. अमेरिकन बँकांचे व्याजदर हे वाढणार नसून यामुळेच ही भाववाढ होत असल्याची माहिती जाणकारांनी दिली.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment