---Advertisement---

लाच भोवली! पाटबंधारे विभागातील लिपिक एसीबीच्या जाळ्यात

---Advertisement---

जळगाव : पाटबंधारे विभागातील एका लिपीकला १४ हजार रुपयाची लाच घेताना धुळ्यातील एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली. तुषार अशोक पाटील असे लाचखोराचे नाव असून या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत थोडक्यात असे की, तालुक्यातील शेतकऱ्यांना मन्याड धरणातून शासनाकडून मोफत गाळ देण्यात येते. परंतु पाटबंधारे विभागाकडून प्रति ट्रॅक्टर १२०० रूपये प्रमाणे ११ जणांकडून १४ हजार ४०० रुपये मागणी होत असल्याची गुप्त माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली.

त्यानुसार एसीबीच्या पथकाने आज शुक्रवारी सकाळी सापळा रचून पाटबंधारे विभागातील लिपिक तुषार पाटील याला लाच स्वीकारताना रंगेहात अटक  पुढील कार्यवाही सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---