---Advertisement---

भयंकर! चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीसह चौघांची केली हत्या, नराधम पती जेलबंद

---Advertisement---

यवतमाळ : पत्नीच्या चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीसह सासरा आणि मेव्हण्यांची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील तिरझडा गावात घडली.

मयताची नावे :
पंडित भोसले (सासरा) सुनील पंडित भोसले (मेहुणा) ज्ञानेश्वर पंडित भोसले (मेहुणा), रेखा गोविंदा पवार (पत्नी) अशी हत्या झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर रुखमा पंडित भोसले या गंभीर जखमी आहेत. दरम्यान, पोलिसांनी आरोपी पती गोविंदा वीरचंद पवार (रा. कळंब),याला जेलबंद केलं असून या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली.

नेमकी घटना काय?
यवतमाल जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इसमाने त्याच्या पत्नीसह सासरा आणि मेव्हण्यांची निर्घृणपणे हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला.
जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील तिरझडा गावात मंगळवारी रात्री ११ वाजता ही दुर्दैवी घटना घडली. पंडित भोसले (सासरा) सुनील पंडित भोसले (मेहुणा) ज्ञानेश्वर पंडित भोसले (मेहुणा), रेखा गोविंदा पवार (पत्नी) अशी हत्या झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर रुखमा पंडित भोसले या गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी नराधम जावयाला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. गोविंदा वीरचंद पवार (रा. कळंब), असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला गोविंदा याला पत्नीवर चारित्र्याचा संशय होता. त्यावरून त्याचे पत्नीसोबत भांडण झाले होते. भांडनानंतर आरोपीची पत्नी माहेरी निघून गेली होती. दरम्यान, याच गोष्टीचा राग मनात धरून आरोपीने मंगळवारी रात्री ११ वाजता थेट सासरवाडी गाठली. तिरझडा गावात गेल्यानंतर आरोपीने बायको, सासू-सासरे आणि दोन मेहुण्यांची निर्घृणपणे हत्या केली.

चौघांची हत्या केल्यानंतर आरोपी गोविंदा फरार झाला होता. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत त्याला अटक केली आहे असून घटनेचा अधिकचा तपास पोलीस करीत आहेत.

यवतमाल जिल्ह्यातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत एका नराधम पतीने सासरवाडीत पत्नीसह जाऊन चौघांची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. आरोपीने त्याची पत्नी, सासरा आणि त्याच्या दोन मेव्हण्यांची निर्घृणपणे हत्या केली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---