---Advertisement---

व्यावल येथे श्रीमद् भागवत सप्ताह मंगळवारी श्रीकृष्ण जन्मोत्सव

---Advertisement---

वैभव करवंदकर
नंदुरबार  :
  जिल्ह्यालगत असलेल्या गुजरात राज्यातील व्यावल (ता. निझर जि. तापी) येथे श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताह प्रारंभ झाला आहे. कथेचे निरूपण नंदुरबार येथील वेदमूर्ती अविनाश हरिश्चंद्र जोशी महाराज करीत आहेत.

व्यावल येथे शुक्रवार दि. 22 डिसेंबर पासून श्रीमद् भागवत कथेस प्रारंभ झाला आहे.दररोज दुपारी दीड ते साडे चार वाजे दरम्यान भागवत कथा सुरू आहे कथेचे निरूपण नंदुरबार येथील वेदमूर्ती अविनाश हरिश्चंद्र जोशी महाराज करीत आहेत.

दरम्यान मंगळवार दि. 26 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव होईल.तसेच शुक्रवार दि. 29 डिसेंबर रोजी श्रीमद् भागवत कथेचा समारोप होऊन महाप्रसाद वितरण करण्यात येईल. श्रीमद्भागवत कथेचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन संयोजक नवरोत्तम छगन पटेल, पुष्पा प्रल्हाद पटेल, प्रल्हाद नरोत्तम पटेल, सीमा अमोल पटेल, अमोल प्रल्हाद पटेल यांनी केले आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment