धुळे : शिंदखेडा तालुक्यातील टेंभलाय शिवारात निंबा माळी (वय ५५ रा. शिंदखेडा) या शेतकऱ्याने शेतातील निंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी घडली. घटना लक्षात येताच त्यांना शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करीत मृत घोषित केले. शिंदखेडा पोलिसात नोंद झाली.
धुळ्यात शेतकऱ्याची आत्महत्या
Published On: डिसेंबर 24, 2023 5:44 pm

---Advertisement---