---Advertisement---

नंदुरबार गवळी समाजातील महिला-युवतींचा शोभायात्रेत उत्साह

---Advertisement---

नंदुरबार : सिदाजी आप्पांचे चांगभले अन राधे राधेचा जयघोष करीत भगवे फेटे परिधान करून डीजे वरील भक्ती गीतांच्या तालासुरात वीरशैव लिंगायत गवळी समाजातील महिला व युवती शोभायात्रेत सहभागी झाल्या होत्या. गवळी समाजातील जेष्ठ कारभारी, पंच मंडळी व युवकांचा देखील मिरवणुकीत अभुतपूर्व जल्लोष दिसून आला.ढोल ताशांच्या गजरात शालेय विद्यार्थी आणि युवकांनी सहभाग नोंदविला. नववर्षाच्या प्रारंभी सोमवारी शहरातून निघालेल्या बालब्रह्मचारी सिदाजीआप्पा देवर्षी आणि राधाकृष्ण मूर्ती शोभायात्रेने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले होते.दरम्यान उद्या बुधवारी महाप्रसाद (भंडारा) वाटपाने दोन्ही मंदिर जिर्णोद्धार आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा समारोप होईल.

नंदुरबार येथील वीरशैव लिंगायत गवळी समाजाचे गुरुवर्य परमपूज्य बालब्रम्हचारी श्री सिदाजीआप्पा देवर्षी तसेच राधाकृष्ण मूर्ती प्राणप्रतिष्ठेनिमित सोमवार दि. 1 जानेवारी रोजी सकाळी शहरातील प्रमुख मार्गावरून भव्य मिरवणूक शोभायात्रा काढण्यात आली. शोभा यात्रेनंतर गवळी वाड्यात पुरोहितांच्या साक्षीने तसेच पाच जोडप्यांच्या उपस्थितीत धार्मिक पूजाअर्चा करण्यात आली. मिरवणूक समाप्तीनंतर गवळीवाड्यात सहभागी सर्व भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. उद्या बुधवार दि. 3 जानेवारी रोजी महाआरती होईल. दुपारी 12 वाजेपासून महाप्रसाद (भंडारा) वाटप करण्यात येईल. भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन नंदुरबार वीरशैव लिंगायत गवळी समाजातर्फे करण्यात आले आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment