---Advertisement---

Maratha reservation : पोलिसांच्या सुट्ट्या रद्द

---Advertisement---

Maratha reservation : मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी जालना – मुंबई अशी पदयात्रा काढणार आहेत. राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यासाठी २० ते २८ जानेवारी दरम्यान सर्व अधिकारी, अंमलदारांच्या साप्ताहिक सुट्ट्या आणि अन्य रजा रद्द केल्या आहेत.

विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) सुहास वारके यांनी याबाबतचे परिपत्रक शुक्रवारी जारी केले . यामध्ये वैद्यकीय रजा वगळण्यात आली आहे. साप्ताहिक सुट्ट्या रद्द करताना शासन निर्णयाचे पालन करावे, असेही परिपत्रकात म्हटले आहे. .

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment