---Advertisement---

इस्रायलचा खान युनूस शहरावर हल्ला; ६५ पॅलेस्टिनी ठार

---Advertisement---

Israel-Hamas War : इस्रायली सैन्याने गाझामधील खान युनिस या दक्षिणेकडील शहरावर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.  या ह्ल्ल्यात सुमारे ६५ हून अधिक पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे, तर हजारो नागरिकांना पळून जावे लागले. इस्रायल-हमास युद्धामुळे आतापर्यंत गाझाच्या २.३ दशलक्ष रहिवाशांपैकी सुमारे ८५ टक्के लोक विस्थापित झाले आहेत.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मात्र हमासवर ‘संपूर्ण विजय’ होईपर्यंत आक्रमण सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे. गाझामध्ये अजूनही बंदिस्त असलेल्या सुमारे १०० ओलिसांना परत करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. दरम्यान, अमेरिकेने मात्र निरपराधांचे संरक्षण करण्याचे आवाहन केले आहे.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment