---Advertisement---
राज्यातील लोकसभेच्या जागावाटपाबाबत आज मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. सभेसाठी नेत्यांचे आगमन सुरू झाले आहे. मुंबईतील नरिमन पॉइंट येथील ट्रायडंट हॉटेलमध्ये होणाऱ्या बैठकीसाठी शिवसेना नेते संजय राऊत, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, वर्षा गायकवाड, जयंत पाटील दाखल झाले आहेत. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महत्त्वाची चर्चा होणार आहे.
---Advertisement---