---Advertisement---
मुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईच्या वेशीवर येऊन धडकले आहे. दरम्यान, वाशी येथील शिवाजी चौकातील सभेत जरांगे पाटील आज दुपारी २ वाजता मराठा आंदोलनाची पुढची दिशा जाहीर करणार आहेत. यावेळी जरांगे पाटील सरकारच्या नव्या जीआरवर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारने आपल्याला काही कागदपत्रे दिली आहेत. सरकारने दिलेल्या कागदपत्रांवर आपल्याला चर्चा करायची आहे. आता रिकामे माघारी जायचे नाही, अशी ठाम भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे.