---Advertisement---

‘झुमका वाली पोरं फेम’ अभिनेत्यावर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण ?

---Advertisement---

नाशिक : लग्नाचे आमिष दाखवून पीडितेवर अत्याचार केल्याप्रकरणी अभिनेता विनोद उर्फ सचिन अशोक कुमावत याच्याविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यु-ट्यूब चॅनलद्वारे गीते प्रसारित करत पीडितेसोबत ओळख वाढवून संशयित कुमावत याने ओळखीचा गैरफायदा घेत लग्नाचे आमिष दाखवून मागील पाच महिन्यांत वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात शारीरिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा कुमावतविरुद्ध दाखल केला आहे.

सातपूर येथील म्हाडा कॉलनीत राहणारा संशयित विनोद उर्फ सचिन कुमावत याचे शूटिंगदरम्यान पीडितेसोबत झालेल्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत व नंतर प्रेमात झाले. कुमावत याने लग्नाचे आमिष दाखवून ३० ऑगस्ट २०२२ ते १७ जानेवारी २०२३ या कालावधीत वेगवेगळ्या ठिकाणी पीडित युवतीला घेऊन जात शारीरिक अत्याचार केले.

तसेच पीडित युवतीने पहिल्या लग्नाबाबत विचारणा केली असता तिला शिवीगाळ करून मारहाण करत लग्नास नकार दिला. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी संशयित कुमावतविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---